ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून, हे एक मोठे ग्रहण असेल, या चंद्रग्रहणाचा अनेक राशींवर परिणाम होईल. मुख्यत: चंद्राचा प्रभाव असलेल्या राशींवर याचा परिणाम होईल.
हे ग्रहण भारतातही दिसणार असल्याने, दुपारी 4 वाजल्यापासून ग्रहणाचा सुतक कालावधी सुरू होईल, तेव्हा देशभरातील सर्व मंदिरांमध्ये दर्शन थांबवले जाईल.
हे ग्रहण पश्चिम प्रशांत महासागर, ऑस्ट्रेलिया, आशिया, युरोप, आफ्रिका, पूर्व दक्षिण अमेरिका, उत्तर-पूर्व उत्तर अमेरिका, अटलांटिक महासागर, हिंद महासागर आणि दक्षिण पॅसिफिक महासागरात दिसणार आहे.
अहमदाबाद, अमृतसर, बेंगळुरू भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, डेहराडून, लुधियाना जयपूर, जम्मू, कोल्हापूर, कोलकाता आणि लखनौ, मदुराई, मुंबई, नागपूर, पटना, रायपूर, राजकोट, रांची, शिमला यासह अनेक शहरांमध्ये दिसणार आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास संपूर्ण भारतात आंशिक चंद्रग्रहण दिसणार आहे. ग्रहणाचा कालावधी 1 तास 19 मिनिटे असेल. ग्रहणाचे उपच्छाया चरण दुपारी 1 वाजता सुरू होईल. 29 ऑक्टोबर रोजी 05 वाजून 02:24 मिनिटांनी समाप्त होईल.
नासाच्या मते, पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण होते. जेव्हा पृथ्वी चंद्र आणि सूर्याच्या मध्ये असते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्राच्या पृष्ठभागावर पडते.
त्यामुळे चंद्राचा पृष्ठभाग अस्पष्ट होतो आणि काही तासांत चंद्राचा पृष्ठभाग पूर्णपणे लाल होतो.
सूर्यग्रहणानंतर आता 28 ऑक्टोबर रोजी चंद्रग्रहण होत आहे. हे ग्रहण भारतातही दिसणार आहे. त्यामुळे या ग्रहणाचा सुतक काळ प्रभावी मानला जाईल.
याच दिवशी कोजीगिरी पौर्णिमा असल्यामुळे खीर प्रसाद साजरा केला जाणार नाही. कारण त्यावेळी ग्रहणाचा प्रभाव चंद्रावर असेल, त्यामुळे खीर चंद्राच्या प्रकाशात ठेवली जाणार नाही