चाणक्यनीती म्हणते की, यश मिळविण्यासाठी जे कठोर परिश्रम करतात त्यांच्यामध्ये काही विशेष गुण असणे आवश्यक आहे, अन्यथा संघर्ष आणि परिश्रम दोन्ही वाया जातात



यशाचा मार्ग सोपा नाही. चाणक्य सांगतात की, माणसाला यश मिळवण्यासाठी समर्पणाची भावना लागते. कठीण मार्गही समर्पणाने सोपा होतो.



शाश्वत यशासाठी, समर्पण, दृढनिश्चय आणि विश्वास आवश्यक आहे.



यश मिळवल्यानंतर नम्र असणे आवश्यक आहे. नम्रता हा गुण माणसाला यशाकडे घेऊन जातो.



अनेक वेळा यशस्वी होण्यासाठी माणसाने आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे, कारण तुमचा अभिमान आणि बोलणे यशाला अपयशात बदलतात.



निष्काळजीपणा माणसाला त्याच्या ध्येयापासून विचलित करतो आणि संधी हिरावून घेतो. यशस्वी व्हायचे असेल तर डोळे आणि कान उघडे ठेवा.



तुमचा निष्काळजीपणा इतरांना जिंकण्याची संधी देऊ शकतो.



चाणक्यांनुसार, महत्वाची कामे आणि निर्णय उशीरा घेणे तुमच्यासाठी हानिकारक असू शकते, शिस्तबद्ध रहा आणि वेळेचे भान ठेवून योग्य वेळी निर्णय घ्या.



तुमच्या कमकुवतपणाला बळ द्या, कारण आत्म-सुधारणा तुम्हाला भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार करेल.



(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)