आचार्य चाणक्य हे भारतातील सर्वोत्तम विद्वानांमध्ये गणले जातात. चाणक्य नीतीमध्ये त्यांनी अनेक विषयांवर सविस्तर चर्चा केली आहे.
चाणक्यांनी मानव कल्याणाचे आपले विचार श्लोकांच्या माध्यमातून मांडले आहेत. चाणक्याचे धोरण हे यश मिळविण्यासाठी रामबाण उपाय मानले जाते.
आचार्य चाणक्य सांगतात की, माणसाचा जास्त सरळपणा त्याच्या गळ्यातला काटाही बनू शकतो. म्हणूनच या कलियुगात यश मिळवायचे असेल तर थोडी हुशारी आवश्यक आहे.
जर तुम्हाला तुमचे भविष्य घडवायचे असेल, तर तुम्ही योग्य वेळ, योग्य मित्र, योग्य ठिकाण, पैसे कमवण्याचे योग्य साधन, पैसा खर्च करण्याचा योग्य मार्ग आणि तुमचा उर्जा स्त्रोत याकडे लक्ष दिले पाहिजे.
चाणक्यांनी या श्लोकात म्हटले आहे की, ज्याला सर्व काही मिळवण्याचा लोभ असतो तो योग्य गोष्टीही सोडून देतो.
जो माणूस काही गोष्टींचा म्हणजे योग्य गोष्टींचा त्याग करतो आणि अनिश्चित म्हणजे चुकीचा मार्ग पत्करतो, त्याचा अधिकारही नष्ट होतो. म्हणून, जेव्हाही तुम्ही कोणताही निर्णय घ्याल तेव्हा बरोबर आणि चुकीचे मोजमाप करा.
चाणक्य म्हणतात की, मनुष्याला त्याच्या कर्तृत्वाने आणि गुणांमुळे श्रेष्ठ मानले जाते.
त्यांनी सांगितले की शिकलेला माणूस गरीब असू शकतो पण श्रीमंतांमध्ये तो आदरणीय असतो.
पैसा, संपत्ती आणि पद याने माणूस महान होत नाही, तसा कावळा महालाच्या शिखरावर बसून गरुड होत नाही.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)