वैवाहिक जीवन आणि प्रेमसंबंधात दोन्ही नात्यांचा पाया विश्वास आणि प्रेमावर अवलंबून असतो पती-पत्नीमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडण होणे आणि प्रेमसंबंध निर्माण होणे ही एक सामान्य आहे परंतु जेव्हा या नात्यात ताळमेळ नसतो, तेव्हा ते नाते दुरावण्याचे मूळ कारण बनते. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात आनंद मिळवायचा असेल तर मानसिक शांती आणि आदराची भावना खूप महत्त्वाची आहे. चाणक्य नीतीमध्ये असे सांगण्यात आले आहे की, लव्ह लाईफ आणि वैवाहिक जीवनात एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. ती एक गोष्ट या नात्यांमध्ये आली तर आनंदी नातीही धुळीला मिळतात. जर वेळीच हे दोष दूर केले नाहीत तर व्यक्तीचे नाते तुटण्याची शक्यता असते. वैवाहिक जीवनात, जेव्हा पती किंवा पत्नीमध्ये अति गर्वाची भावना निर्माण होते, तेव्हा नात्यातील आदर संपतो. चाणक्य म्हणतात की, अशा नात्यांमध्ये अनावश्यक कलहाचे मूळ कारण अहंकार आहे. गर्वाच्या नशेत असलेल्या व्यक्तीचे वैवाहिक जीवन तणाव आणि दुःखात जाते.