चाणक्याची धोरणे यशासाठी रामबाण उपाय आहेत



चाणक्यनीती म्हटंलय की, एक शक्तिशाली शत्रू आणि दोन तोंडी मित्र नेहमी दुःख देतात. यापासून सावध राहिले पाहिजे.



बुद्धिमान व्यक्तीने कधीही उपाशी राहू नये. उपाशी राहिल्यास बुद्धी काम करत नाही, कारण मोठ्या समस्यांवर शहाणपणानेच सहज मात करता येते.



चाणक्याच्या मते, जिथे आदर नाही, जिथे कमाईची साधने नाहीत, जिथे ज्ञानाची साधने नाहीत. जिथे मित्र आणि नातेवाईक नाहीत तिथे राहून फायदा नाही. अशी जागा त्वरित सोडली पाहिजे.



जीवनात यश मिळवण्यासाठी चाणक्याने दोन खास सूत्रे दिली आहेत.



चाणक्यनीतीत म्हटंलय की, ज्याप्रमाणे पक्षी दोन पंखांच्या मदतीने आकाशात उडतात, त्याचप्रमाणे मनुष्य कृती आणि ज्ञान या दोन पंखांच्या साहाय्याने यशाच्या आकाशात उडू शकतो.



चाणक्य म्हणतात की, जर तुम्हाला आनंदी आणि यशस्वी व्हायचे असेल तर नेहमी खरे बोला.



भान ठेवून खर्च करा आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहा. जे असे करतात त्यांना शांत झोप लागते



आचार्य चाणक्य आजही त्यांच्या धोरणांमुळे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या धोरणांचा अवलंब केल्यास दैनंदिन जीवनातील अनेक समस्यांपासून वाचू शकतो.



(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)