कान्स 2022 फिल्म फेस्टिव्हलमध्ये पहिल्या दिवसापासूनच बॉलीवूडच्या सौंदर्यवतींनी वर्चस्व गाजवलं आहे कान्सच्या रेड कार्पेटवर स्टायलिश आणि सिझलिंग लुकसह बी-टाऊनच्या अभिनेत्रींचं जगभरातून कौतुक होत आहे दीपिका पदुकोणनंतर आता बॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा स्टायलिश लूक समोर आला आहे उर्वशीने यंदा कान्सच्या रेड कार्पेटवर पदार्पण केलं आहे उर्वशी रौतेला रेड कार्पेटवर ग्लॅमरस व्हाइट कलरच्या गाऊनमध्ये दिसली उर्वशीला या लूकमध्ये एखाद्या राजकुमारीप्रमाणे दिसत आहे पांढऱ्या रंगाच्या ऑफ शोल्डर रफल गाऊनमध्ये उर्वशी सौंदर्य खुलून गेलं आहे उर्वशीने स्टायलिश इअर रिंग आणि ब्रेसलेटसह तिचा रेड कार्पेट लूक पूर्ण केला आहे उर्वशीचा ड्रेस जितका स्टायलिश आहे तितकाच तिचा मेकअपही सुंदर आहे पांढऱ्या आउटफिटसह लाल लिपस्टिक लावून उर्वशीने तिच्या मेकअपला बोल्ड लूक दिला आहे उर्वशीने तिच्या मेकअपला ग्लोइंग बेस, काजल, आयलायनर, मस्करा आणि ब्लशरसह ग्लॅमरस टच दिला आहे उर्वशीच्या बन हेअरस्टाईलमुळे तिचा लूक अधिक आकर्षक वाटत आहे