टाटा समूहाच्या मालकीची विमान कंपनी एअर इंडियाला पुढील 18 महिन्यांसाठी दर 6 दिवसांनी एक नवीन विमान मिळणार



एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन यांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली



विल्सन यांनी सांगितलं की, एअर इंडिया कंपनीने एकूण 470 विमानांची ऑर्डर दिली आहे.



आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी एअर इंडियाची नवीन विमाने तैनात केली जात आहेत.



एअर इंडियाच्या सीईओंनी म्हटलं आहे की, आम्ही अनेक नवीन क्रू आणि कर्मचाऱ्यांची भरती करत आहोत.



कर्मचाऱ्यांना नव्याने प्रशिक्षण देण्यात येत आहे.



असोसिएशन ऑफ एशिया पॅसिफिक एअरलाइन्सच्या अध्यक्षांच्या 67 व्या संमेलनात बोलताना त्यांनी ही माहिती दिली



विल्सन यांनी इतर विमान कंपन्यांशी स्पर्धा करण्याचा आणि एअर इंडियासाठी वाहतूक वाढविण्याचा विश्वासही व्यक्त केला.



एअर इंडिया ही देशांतर्गत विमान कंपन्यांमध्ये सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय उड्डाणे नेटवर्क असलेली विमान कंपनी आहे.



आगामी काळात कंपनी आपल्या ताफ्यात विमानांची संख्या वाढवून प्रवाशांना नवा अनुभव आणि सेवा देण्याचा विचार करत आहे.