मूळचा ताजकिस्तानचा असलेला गायक 'बिग बॉस'फेम अब्दु रोजिक याची आज मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडी चौकशी होणार आहे. (Photo credit : instagram/abdu_rozik) ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानुसार आज अब्दु ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहणार आहे. (Photo credit : instagram/abdu_rozik) अब्दुला आज दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास मुंबई ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. (Photo credit : instagram/abdu_rozik) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी त्याची चौकशी करण्यात येणार आहे. (Photo credit : instagram/abdu_rozik) मात्र, अब्दुला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात साक्षीदार म्हणून हजर राहण्यासाठी बोलावण्यात (Photo credit : instagram/abdu_rozik) आल्याचे त्याच्या वकिलांनी स्पष्ट केले असल्याचे वृत्त 'आज तक'ने दिले आहे. (Photo credit : instagram/abdu_rozik) अब्दु रोजिक एक व्यावसायिक देखील आहे. (Photo credit : instagram/abdu_rozik) अब्दुचे अनेक देशांमध्ये आलिशान रेस्टॉरंट आहेत. (Photo credit : instagram/abdu_rozik) बिग बॉस 16 मधून बाहेर पडल्यानंतर अब्दूने मुंबईत 'बर्गीर' नावाचे एक आलिशान रेस्टॉरंटही उघडले. (Photo credit : instagram/abdu_rozik) रिपोर्ट्सनुसार, त्याच्या रेस्टॉरंटमध्ये आणखी काही कंपनीचे पैसे गुंतवले गेले आहेत. (Photo credit : instagram/abdu_rozik) ही कंपनी ड्रग्जचा व्यवहार करते, असे सांगितले जात आहे. (Photo credit : instagram/abdu_rozik) या प्रकरणी ईडीने अब्दुला समन्स पाठवले असून त्याची चौकशी सुरू आहे.(Photo credit : instagram/abdu_rozik)