अभिनेता विद्युत जामवालचा 'फिटनेस मंत्र' वजन कमी करण्यासाठी साखर-मीठ खाणं बंद करु नका. सध्या अनेक जण स्लीम आणि फीट फिगरसाठी वजन कमी करतात. वजन कमी करण्यासाठी अनेक जण आहारात साखर, मीठ खाणं टाळतात. काही जण मीठ, साखर आणि कार्बोहायड्रेट्स खाणं पूर्णपणे बंद करतात. पण, असं करणं चुकीचं आहे. बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल याने फिट राहण्यासाठीच्या आहाराबाबत सांगितलं आहे. विद्युत जामवाल बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेता आहे. विद्युत जामवालने मार्शल आर्ट्सचंही प्रशिक्षण घेतलं आहे. विद्युतने सांगितलं की, आहाराती कार्ब्स मेंदूच्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक आहेत. शरीरातील कार्ब्सच्या कमतरतेमुळे मेंदूच्या आरोग्यावर वाईट परिणामन होतो. डिप्रेशन, एग्रेशन, एंग्जायटी, नर्वसनेस यासारख्या समस्या कार्बोहायड्रेट्सच्या कमतरतेमुळे होतात. मीठ, साखर आणि कार्बोहायड्रेट्स शरीरासाठी गरजेचे आहेत. त्यामुळे फिट राहण्यासाठी हे खाणं टाळू नका. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.