बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा विजेता कळव्याचा अक्षय केळकर ठरला आहे. अक्षयने 2013 साली 'बे दुने दहा' या मालिकेच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. अक्षयने 'कमला' मालिकेत साकारलेली उदय देशपांडेची भूमिका प्रचंड गाजली. अक्षयने 'प्रेमसाथी' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. अवधूत गुप्तेच्या 'कान्हा' या सिनेमात अक्षयच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली आहे. 'कॉलेज कॅफे' या सिनेमात अक्षय मुख्य भूमिकेत होता. अक्षयने सब टीव्हीच्या 'भाखरवडी' या हिंदी मालिकेतदेखील काम केलं आहे. अक्षय केळकरला जिंकल्याबद्दल ट्रॉफी आणि 15 लाख 55 हजार इतकी रक्कम बक्षीस म्हणून मिळाली आहे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता होण्यासोबत अक्षय या पर्वाचा 'कॅप्टन ऑफ द सिझन' ठरला आहे. अक्षय सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह आहे.