चिंच म्हटलं की भल्याभल्यांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. चिंचेचा वापर सर्रासपणे अनेक घरांमध्ये केला जातो. चिंच चवदार असण्यासोबतच अनेक गुणांनी देखील परिपूर्ण आहे.

आज आपण चिंच नव्हे तर त्याच्या पानांच्या फायद्यांबद्दल बोलणार आहोत. ज्यामध्ये चिंचेसारख्या अनेक घटकांचा समावेश आहे, जे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत.

चिंचेच्या पानाचा चहा खूप फायदेशीर असतो. त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत..

चिंचेच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटीऑक्सिडंट, मलेरियाविरोधी आणि दमाविरोधी गुणधर्म असतात. जे आपले यकृत आणि पोट दोन्हीसाठी फायदेशीर असतात, महत्वाचं म्हणजे तुमचे वजन कमी करण्यास मदत करतात.

तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर चिंचेच्या पानांपासून बनवलेला चहा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. हा चहा आपल्या एक नाही तर एकाचवेळी अनेक गोष्टींसाठी फायदेशीर ठरतो.

चिंचेची पाने वजन कमी करण्यासाठी खूप मदत करतात. त्यात हायड्रोक्सिल अॅसिड आढळते.

हा चहा करण्यासाठी सर्व प्रथम चिंचेची पाने नीट धुवून घ्या.

यानंतर एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात किसलेले आले, चिंचेची पाने, हळद, पुदिन्याची पाने घालून 4-5 मिनिटे उकळू द्या.

यानंतर ते गाळून एका कपमध्ये काढा आणि थोडे थंड झाल्यावर त्यात मध मिसळून प्या.