शेंगदाण्यात कॅल्शियम आणि व्हिटामिन डीची मात्रा अधिक असते. त्यामुळे हाडेही मजबूत होतात. जे तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे,तर तुम्ही जर सकाळी रिकाम्या पोटी शेंगदाणे खाल्ले तर तुमची त्वचा देखील निरोगी राहते. व्हिटॅमिन बी 3 असल्याने,शेंगदाणे सर्व प्रकारच्या त्वचा रोगांपासून दूर ठेवतात. हे सुरकुत्या आणि हायपरपिग्मेंटेड स्पॉट्स कमी करण्यास देखील मदत करते. शेंगदाण्यातील फायटोस्टेरॉल प्रोस्टेट ट्यूमरची वाढ 40% पेक्षा कमी करतात. त्याचबरोबर शरीराच्या इतर भागांमध्ये पसरणाऱ्या कर्करोगाच्या घटना जवळजवळ 50% कमी करतात. शेंगदाण्यात ओमेगा ३ फॅटी अॅसिड आढळते. फॅटी ऍसिडचे सेवन केल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढते. शेंगदाणे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहातो. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण ५.१ टक्क्यापर्यंत कमी होते. शेंगदाणे फोलेटचा एक चांगला स्रोत आहे, विशेषत: गरोदरपणात कारण ते न्यूरल ट्यूब दोषांचा धोका कमी करते. टीप : या सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने.