पपई हे खूप स्वादिष्ट आणि आरोग्यदायी फळ आहे. पपई खाणे केवळ त्वचेसाठीच नाही तर आरोग्यासाठीदेखील चांगले असते. चेच्या संदर्भातील समस्या दूर करण्यासाठी पपईच्या बिया फायदेशीर ठरतात. या बियांमुळे त्वचा मऊ आणि चमकदार बनते. पपईच्या बिया जळजळ कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. पपईच्या बियांमध्ये व्हिटॅमिन सी, अल्कलॉइड्स, फ्लेव्होनॉइड्स भरपूर प्रमाणात असतात. संधिवात किंवा जळजळी सारख्या समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी पपईच्या बिया उपयोगी पडतात. हृदयविकाराच्या आजारांपासून सुटका करण्याचा पपईच्या बिया हा रामबाण उपाय आहे. पपईमध्ये अॅंटीऑक्सीडंट मोठ्या प्रमाणात आढळते. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी पपईच्या बिया फायदेशीर आहेत. टीप: वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.