टाटाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार कोणती आहे?

Published by: एबीपी माझा वेब टीम

टाटाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार टियागो इव्ही आहे.

टाटाची ही इव्ही दोन बॅटरी पॅक पर्यायांसोबत येते - 19.2 kWh आणि 24 kWh.

टाटा टियागो इव्ही 19.2 kWh च्या बॅटरी पॅकसह 223 किलोमीटरची रेंज देण्याचा दावा करते.

टाटाची ही इलेक्ट्रिक कार 24 kWh च्या बॅटरी पॅकसह एका चार्जिंगमध्ये 293 किलोमीटरची रेंज देऊ शकते.

टाटाच्या या कारला चार्ज करण्यासाठी 3.3 kW AC चार्जर बॉक्सचा वापर केला जातो.

टाटा टियागो ईव्ही मध्ये फास्ट चार्जिंगसाठी 7.2 kW चा एसी फास्ट होम वॉल बॉक्स चार्जर लावावा लागेल.

टाटाच्या या इलेक्ट्रिक कारला तुम्ही घरीही चार्ज करू शकता.

टाटा टियागो इव्ही मध्ये सुरक्षिततेसाठी 2 एअरबॅग्ज मिळतात.

टायगो इव्हीची एक्स-शोरूम किंमत 7.99 लाख पासून सुरू होऊन 11.14 लाखांपर्यंत जाते.