जगातील सर्वात महागडी कार कोणत्या 3 लोकांकडे आहे?

Published by: एबीपी माझा वेब टीम

रोल्स रॉयसच्या गाड्यांना जगभरात पसंती आहे.

तुम्हाला माहीत आहे का की जगातील सर्वात महागडी कार कोणाकडे आहे?

रोल्स-रॉयस कंपनीची बोट टेल कार जगातील सर्वात महागड्या कारमध्ये गणली जाते.

या रोल्स रॉयस गाडीची किंमत 233 कोटी रुपये आहे.

रोल्स-रॉयस बोट टेल 4 सीटर सुपरलक्झरी कन्व्हर्टेबल कार आहे.

गाडीची सर्वात मोठी खासीयत म्हणजे तिची 3 युनिट्स बनवली आहेत.

तिन्ही गाड्यांपैकी एकाचा मालक अब्जाधीश रॅपर जे-झेड आणि पत्नी बेयॉन्से आहे.

दुसरी युनिट अर्जेंटिनाचे फुटबॉलपटू माउरो इकार्डी यांच्याकडे आहे आणि तिसरी युनिट पर्ल इंडस्ट्रीजच्या मालकाकडे आहे.

या तीनही युनिट्स ग्राहकांनुसार कस्टमाइज केल्या आहेत.