Maruti Fronx Hybrid कधी लॉन्च होणार?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई

इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढतेय, पण हायब्रिड कारही लोकांचं लक्ष वेधून घेत आहेत.

मारुती सुझुकीच्या हायब्रिड गाड्या बाजारात आहेत. या गाड्या स्ट्राँग हायब्रिड तंत्रज्ञानासह येतात.

ग्रँड विटारा आणि इनव्हिक्टो याच गाड्या आहेत. हायब्रिड असल्यामुळे ह्या गाड्या 1200 KM पेक्षा जास्त रेंज देतात.

गाडीत स्ट्राँग हायब्रिड तंत्रज्ञानात इलेक्ट्रिक मोटर आणि इंटरनल कंबशन इंजिनचे संयोजन असते.

या गाड्यांची सर्वात खास गोष्ट म्हणजे, ब्रेक लावल्यानंतर गाडीची शक्ती पुनर्जन्मित होते.

नवीन मारुती फ्रोंक्स एक सिरीज हायब्रिड असू शकते. अशा गाड्या पेट्रोल इंजिनमध्ये सिरीज हायब्रिड प्रणालीसह गाडीची रेंज वाढवतात.

1. 5 किंवा 2 kWh बॅटरी पॅक असलेली मोटर पेट्रोल इंजिनसोबत मिळू शकते, जी फ्रंट व्हील ड्राइव्ह प्रणालीसह येऊ शकते.

नवीन मारुती फ्रोंक्स हायब्रिडची खासियत ह्या गाडीची मायलेज असू शकते. ही कार 35 kmpl च्या मायलेजसोबत येऊ शकते.

असे मानले जाते आहे की नवीन Maruti Fronx Hybrid ची किंमत पेट्रोल व्हर्जनपेक्षा सुमारे 2 ते 2.5 लाख रुपये जास्त असेल.