इनोव्हा क्रिस्टा खरेदीचा प्लॅन? डाउन पेमेंट किती लागेल?

Published by: एबीपी माझा वेब टीम

प्रसिद्ध टोयोटा इनोव्हा क्रिस्टा 7-सीटर आणि 8-सीटर कॉन्फिगरेशनमध्ये येते.

ही कार फक्त डिझेल इंजिनमध्ये येते. या गाडीत पेट्रोल इंजिन नाही.

टोयोटा इनोव्हा क्रिस्टाची किंमत 18.66 लाखापासून सुरू होऊन 25.36 लाख रुपयांपर्यंत जाते.

टोयोटाच्या या गाडीच्या सर्वात स्वस्त 7 सीटर मॉडेलची किंमत 18.66 लाख रुपये आहे.

टोयोटाची ही कार 16.80 लाख रुपयांच्या कार लोनवर खरेदी करता येते.

इनोव्हा क्रिस्टा या मॉडेल खरेदी करण्यासाठी 1.87 लाख रुपयांची डाउन पेमेंट करावी लागेल.

पाच वर्षांच्या कर्जावर 9 टक्के व्याज दराने, दर महिन्याला 34,850 रुपये हप्ता भरावा लागेल.

सहा वर्षांच्या कर्जावर 9 टक्के व्याज दराने 30,259 रुपयांची EMI भरावी लागेल.

सात वर्षांसाठी कर्ज घेतल्यास, 9 टक्के व्याज दराने दरमहा 27,000 रुपये हप्ता भरावा लागेल.