भारतीय बाजारपेठेत स्कूटरला नेहमीच चांगली मागणी राहिली आहे. परवडणारी किंमत, उत्कृष्ट मायलेज आणि कमी देखभाल खर्च यामुळे मध्यमवर्गीयांसाठी स्कूटर ही आजही एक आवश्यक गरज बनली आहे.
सध्या बाजारात अनेक उत्तम स्कूटर्स उपलब्ध असल्या तरी ग्राहकांना आता काहीतरी नवीन आणि आकर्षक हवे आहे.
ही गरज लक्षात घेऊन Honda कंपनीने भारतात आपल्या नवीन Scoopy स्कूटरचे नाव पेटंट केले आहे. यामुळे हा स्कूटर लवकरच बाजारात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Honda Scoopy मध्ये रेट्रो स्टाईल आणि आधुनिक डिझाइनचे सुंदर मिश्रण आहे. याचे वळणदार बॉडी पॅनल आणि सिग्नेचर रेट्रो डिझाइन यामुळे हा स्कूटर उठून दिसतो.
या स्कूटरमध्ये १०९.५ सीसी क्षमतेचे एअर-कूल्ड इंजिन आहे, जे सुमारे ९ बीएचपी शक्ती आणि ९.२ न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते.
या स्कूटरमध्ये 109.5 सीसी क्षमतेचे एअर-कूल्ड इंजिन आहे, जे सुमारे 9 बीएचपी शक्ती आणि 9.2 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते.
या इंजिनला CVT (कंटिन्युअसली व्हेरीएबल ट्रान्समिशन) प्रणालीशी जोडले आहे, जी सर्वसाधारण ऑटोमॅटिक स्कूटर्समध्ये आढळते. पुढे टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागे मोनोशॉक सस्पेन्शन देण्यात आले आहे.
या स्कूटरमध्ये १२ इंचांची अलॉय चाके आहेत. समोर डिस्क ब्रेक आणि मागे ड्रम ब्रेक देण्यात आले असून ब्रेकिंग व्यवस्थित आणि सुरक्षित आहे.
Scoopy मध्ये एलसीडी इन्स्ट्रुमेंट कन्सोल, स्मार्ट कीसह कीलेस इग्निशन, एलईडी लाईट्स आणि अँटी-थेफ्ट अलार्म प्रणालीसारखी आधुनिक वैशिष्ट्ये आहेत.
सध्या Honda कंपनीने Scoopy भारतात केव्हा लॉन्च होईल याची अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र नावाचे पेटंट नोंदवल्यामुळे लवकरच याची घोषणा होण्याची शक्यता आहे.