रावणाचा पुतळा जाळण्याची परंपरा नेमकी कुठून सुरु झाली असा प्रश्न अनेकदा तुम्हाला पडला असेल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: Instagram/katija4120

नवरात्रीनंतर दसऱ्याचा सण संपूर्ण देशात साजरा केला जाणार आहे.

Image Source: Instagram/vikram_singhmar786

या सणावर दरवर्षी रावणाचे प्रतिकात्मक पुतळे जाळले जातात.

Image Source: Instagram/chandigarhwebdesigners

पण, तुम्हाला माहीत आहे का की रावणाचे पुतळे जाळण्याची परंपरा नेमकी कुठून सुरु झाली?

Image Source: INstagram/akshi_123

रावणाचा पुतळा जाळण्याची परंपरा स्वातंत्र्यानंतर सुरु झाली.

Image Source: Instagram/hello_samir

रावणाचा पुतळा सर्वात आधी 1948 मध्ये रांची येथे पेटवला गेला.

Image Source: Instagram/dwwvloger23

हा पहिल्यांदा पाकिस्तानातून आलेल्या निर्वासितांनी पेटवला होता.

Image Source: Instagram/dwvlogger23

येथे एक लहान पुतळा जाळला गेला, जो नंतर हळुहळू संपूर्ण भारतात पसरला.

Image Source: Instagram/its__dk__gupta

ही परंपरा वाईटवर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानली जाते.

Image Source: Instagram/drf3098

देशाची राजधानी दिल्लीतील रामलीला मैदानावर सर्वात आधी रावणाचे प्रतिकात्मक चित्र 17 ऑक्टोबर 1953 रोजी जाळण्यात आले होते.

Image Source: Instagram/apna_bhanpura

त्यावेळी कागद आणि लाकडाऐवजी रावणाचे पुतळे कपड्याचे बनवले जात होते.

Image Source: Instagram/kirat_di_queen