घरात आरसा नेहमी अशा जागी ठेवावा जिथे शुभ गोष्टींचं प्रतिबिंब दिसेल.

...तर घरात दारिद्र्य येईल

आरसा चुकीच्या जागी ठेवल्यावर घरात दारिद्र्य येईल.

वास्तू शास्त्रानुसार, घरात या पाच ठिकाणी कधीही आरसा ठेवू नये. यामुळे तुमच्या घरातील सुख-संपत्तीवर वाईट परिणाम होतो.

पलंगाच्या समोर

आरसा लावताना कधीही पलंगाच्या समोर ठेवू नये, यामुळे पती-पत्नीमधे तणाव वाढतो.

उत्तर दिशा

घरामध्ये आरसा उत्तर किंवा दक्षिण दिशेला लावू नये, याचा वाईट परिणाम घरातील सुख-समृद्धीवर पडतो.

गोल आकार

वास्तू शास्त्रानुसार, घरात गोल आकाराचा आरसा ठेवू नये. चौकोनी किंवा आयताकार आरसा शुभ मानला जातो.

उंचीवर

घरात आरसा लावताना खूप उंच जागेवर किंवा खूप खाली लावू नये, यामुळे घरात रोग-आजार बळावतात.

तुटलेला आरसा

घरात तुटलेला किंवा अस्पष्ट दिसणारा आरसा असेल, तर तो तत्काळ हटवा. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा बळावते.

झोपताना आरसा पाहणे

झोपताना आरसामध्ये स्वत:चं प्रतिबिंब पाहू नये

उठल्यावर आरसा पाहणे

तसेच सकाळी उठल्यावरही आरशात चेहरा पाहू नये.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.