तुमच्या कामामध्ये अंतिम यश तुमचेच आहे हे लक्षात ठेवा. तुमच्या शिस्तबद्ध ध्येय धोरणामुळे धंद्यात लाभ चांगले होतील.
कर्जबाजारी असणाऱ्यांना कर्जफडीचा फक्त तगादा लागेल. लोकांचे चार शब्द ऐकूनही घ्यावे लागतील.
थोडी कल्पनाशक्ती आणि अंगात धडाडी असेल तर न घाबरता सर्व गोष्टींना तोंड द्याल.
तुमची बौद्धिक बाजू जगाला दिसेल. महिला थोड्या अस्वस्थ राहतील.
ज्यांना परदेश प्रवास करायचा आहे त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता वेळेवर न झाल्यामुळे अडचणी निर्माण होतील.
संततीच्या अंगी असलेली धडाडी पाहून आश्चर्यचकित व्हाल आणि त्यांना प्रोत्साहनही द्याल.
लेखकांच्या भावा विश्वातून निर्माण झालेले लेखन प्रसिद्ध पावेल.
चाकोरी बाहेर तुम्ही मांडलेले विचार जोडीदार, कुटुंबातील लोकांना न पटल्यामुळे निकालात निघतील.
विद्यार्थी आपल्या कल्पना साम्राज्यात रमतील कलावंतांना ग्रहांची साथ मिळेल.
प्रियकऱ्यांची निरपेक्ष प्रेमाची बाजू मोठ्यांना कळल्यामुळे विरोध नष्ट होतील.
जोडीदाराशी खटके उडाले तरी पुन्हा एकत्र येणार आहात. ताण निघून जाईल.
तुमच्या आजच्या वागण्यामुळे हाताखालचे लोक तुम्हाला जरा दबकुनच राहतील.
टीप: वरील उपाय केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.