वास्तुशास्त्रात, स्वयंपाकघराच्या संबंधित देखील अनेक नियम सांगण्यात आले आहेत.
तुमच्या स्वयंपाकघरात कधीच कोणत्याच गोष्टीची कमी पडू देऊ नका. अन्यथा तुम्हाला नकारात्मक परिणामांना सामोरं जावं लागू शकतं.
या नियमांचं जर तुम्ही योग्य पालन केलं तर तुम्हाला त्याचे अनेक शुभ परिणाम मिळू शकतात.
वास्तूशास्त्रा नुसार, ज्या भांड्यात तुम्ही मीठ ठेवता त्याला कधीच रिकामं ठेवू नका. यामुळे तुमच्या घरात आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात.
हळदीचा वापर अनेक मंगल कार्यात, समारंभात केला जातो.
वास्तूनुसार, स्वयंपाकघरात हळदसुद्धा कधी कमी पडू देऊ नका. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा वावर होतो.
भारतीय संस्कृतीत पीठ हा आपल्या आहारातला एक महत्त्वाचा घटक आहे.
वास्तूशास्त्रानुसार घरात तांदूळ, गहू, पीठ असणं म्हणजे धनधान्याची बरकत असण्याचं लक्षण आहे.
घरातील तांदूळही कधी कमी पडू देऊ नका, याचा थेट संबंध शुक्र ग्रहाशी आहे. यामुळे घरात सुख-शांतीदेखील राहत नाही.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)