अनेकदा आपल्या हातून चुकून काही गोष्टी पडतात किंवा सांडतात.
आपण पडलेल्या वस्तू उचलून त्यांच्या जागी ठेवून देतो, सांडलेल्या वस्तू भरुन ठेवतो.
या गोष्टी काही अशुभ संकेत देत असतात. काही गोष्टी वारंवार पडणं शुभ मानलं जात नाही.
किचन ओट्यावर कोणत्या गोष्टी सांडणं अशुभ मानलं जातं? जाणून घेऊया.
वास्तुशास्त्रानुसार, किचनमध्ये दूध उतू जाणं हे देखील अशुभ संकेत देतं.
दुधाचा संबंध चंद्रग्रहाशी आहे.
जर किचनमध्ये मीठ सांडले तर ते अशुभ समजलं जातं. किचनमध्ये मीठ कधीही सांडू देऊ नये.
याचा अर्थ तुमच्या आयुष्यात समस्या वाढू शकतात, तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं.
मोहरीच्या तेलाचा संबंध शनिदेवाशी आहे. स्वयंपाकघरात दूध वारंवार सांडत असेल, तर ते तुमच्या कुंडलीतील चंद्रग्रहाची कमजोरी दर्शवते.
स्वयंपाकघरात मोहरीचं तेल वारंवार सांडत असेल, तर ते शुभ लक्षण मानलं जात नाही.