आज मन खूप संवेदनाक्षम राहील, कोणत्याही तणावाला बळी न पडता आपल्या कामाचे योग्य नियोजन करा
आज अनेक इच्छांची पूर्ती करणारा दिवस आहे, बरेच दिवसांपासून एखादे काम करण्याची इच्छा असेल तर ते त्वरित हातात घ्या
तुमच्या मेहनतीला यशाचे फळ निश्चित लागणार आहे, तुमच्या बौद्धिकतेला जास्त बळ मिळेल
आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तुंग झेप घ्याल, आपल्या हुशारीचा उपयोग विधायक गोष्टी करण्याकडे करा
आज रागावर नियंत्रण ठेवावे लागेल, आजूबाजूच्या परिस्थितीशी मिळते जुळते घ्यावे लागेल
गृह सौख्याच्या बाबतीत बऱ्याच समाधानकारक घटना घडतील, स्थावर इस्टेटचे प्रश्न मार्गी लागतील
वैवाहिक जीवनात तडजोड करावी लागली तरी ती सुखावह वाटेल, एखाद्या गोष्टीबाबत हाव धरण्यात तोटा होण्याची शक्यता आहे
हातचे सोडून पळत्याच्या मागे जाऊ नये, जोडीदाराच्या तब्येतीला जपावे लागेल
जवळ असलेल्या पैशाला लवकर बँकेची वाट दाखवा, नाहीतर खर्च होऊन जातील
महिलांनी जास्तीत जास्त संयम ठेवण्याचा प्रयत्न करावा, पराक्रम आणि प्रसिद्धी मिळेल
प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार कराल आणि थोडे गंभीर पण होणार आहात
एखादे काम सातत्याने आणि चिकाटीने कराल, रेंगाळलेली कामे मार्गी लागतील
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.