मग त्याची साथ लागल्यामुळे सर्व बाबतीत तुमची सरशी होईल.
समाजात मानाचे स्थान मिळेल तुमच्या दिलदार आणि उदार वृत्तीचा अनुभव लोकांना द्याल.
तुमच्यातील चांगले गुण हेरले जातील तुमच्याशी स्वभावी व्यक्तिमत्त्वामुळे अनेक माणसे जोडली जातील.
महिला दुसऱ्याला जास्तीत जास्त मदत करतील स्वतःचा आत्मविश्वास दृढ होत जाईल.
कोणत्याही समस्येची टक्कर देण्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण होईल.
स्वतःवर विश्वास ठेवून जोमाने कामाला लागाल नवीन विचाराचा अवलंब कराल.
व्यवसायात एक नवीन चैतन्य निर्माण कराल वारा येईल तशी पाठ फिरवण्याची हातोटी साधेल.
समय सूचकतेमुळे अनेक तोटे वाचू शकाल राजकारणी लोकांना मनाप्रमाणे काम करून घेण्याची संधी मिळेल.
मुत्सद्दी स्वभावामुळे मी मी म्हणणाऱ्यांना गार कराल जोडीदाराच्या मनाप्रमाणे वागण्यात सफल व्हाल.
चित्रकला फोटोग्राफी यांची आवड असणारे चांगल्या कलाकृती निर्माण करतील महिला बौद्धिक गोष्टीत रस घेतील.
दुसऱ्याच्या आनंदात सहभागी व्हाल पण स्वतःच्या मनाप्रमाणे जर कोणी वागले नाही तर रागाचा पारा चढेल.
जोडीदाराचे आरोग्य संदर्भात काळजी घ्यावी लागेल कोणत्याही कुपथ्य अति कष्ट किंवा अति ताण प्रकृतीला झेपणार नाही.