शनीदेवाला तेल चढवणं आणि दान करणं फार शुभ मानलं जातं. कधीही खराब झालेलं तेल वापरुन दान करु नका. नेहमी शुद्ध तेलाचा वापर करा.
मान्यतेनुसार, शनी जयंतीच्या दिवशी केस आणि नखं कापणं अशुभ मानलं जातं.
शनी जयंतीच्या दिवशी सात्विक आहार घेणं शुभ मानलं जातं. या दिवशी मांसाहारी पदार्थांपासून दूर राहा.
शनीला न्यायदेवता म्हणतात, त्यामुळे शनीला अन्याय अजिबात आवड नाही. यासाठीच शनी जयंतीच्या दिवशी कोणालाही चुकून कोण्या गरिबाचा अपमान करु नका, गरजूंचा अपमान करु नका.