ज्योतिषशास्त्रानुसार, हा आठवडा ग्रहांच्या दृष्टीने हा आठवडा फार महत्त्वाचा आहे.

Published by: जगदीश ढोले
Image Source: GOOGLE

मेष रास (Aries)

या आठवड्यात आर्थिक स्थिती चांगली राहील, पण शेवटी थोडी तंगी जाणवू शकते; कौटुंबिक वातावरण अनुकूल असेल.

Image Source: ABP MAJHA

वृषभ (Taurus)

आरोग्य उत्तम राहील आणि व्यवसायात प्रगती होईल; नोकरदारांना प्रमोशनची शक्यता आहे.

Image Source: ABP MAJHA

मिथुन (Gemini)

भाग्य साथ देईल, आर्थिक स्थिती बळकट होईल आणि घरात आनंदाचे वातावरण राहील.

Image Source: ABP MAJHA

कर्क (Cancer)

आरोग्याच्या बाबतीत आव्हानं येऊ शकतात, विशेषतः त्वचा व एलर्जीचा त्रास होण्याची शक्यता.

Image Source: ABP MAJHA

सिंह (Leo)

नवीन संधी मिळतील, प्रगतीचे दरवाजे उघडतील आणि धार्मिक कार्यात सहभाग वाढेल.

Image Source: ABP MAJHA

कन्या रास (Virgo)

व्यवसायात प्रगती होईल, रखडलेली कामं पूर्ण होतील आणि मानसिक समाधान मिळेल.

Image Source: ABP MAJHA

तूळ रास (Libra)

एखादी शुभवार्ता मिळेल. ग्रहांची स्थिती अनुकूल असल्याने फारसा त्रास होणार नाही. आर्थिक स्थिती चांगली राहील आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळतील.

Image Source: ABP MAJHA

वृश्चिक रास (Scorpio)

तब्येत चांगली राहील आणि सकारात्मक विचार वाढतील. आठवड्याच्या शेवटी डोळ्यांशी संबंधित त्रास होऊ शकतो, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Image Source: ABP MAJHA

धनु रास (Sagittarius)

नवीन गोष्टी शिकायला मिळतील. रखडलेले पैसे परत मिळतील आणि मेहनतीला यश मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल.

Image Source: ABP MAJHA

मकर रास (Capricorn)

चढ-उताराचा सामना करावा लागेल आणि त्यामुळे मानसिक तणाव वाढेल. आर्थिक स्थिती चांगली राहील.धार्मिक कामात सहभाग आणि प्रवासाचा योग संभवतो.

Image Source: ABP MAJHA

कुंभ रास (Aquarius)

लव्ह लाईफ सुखद असेल आणि व्यवसायात वाढ होईल. नवीन कामाची सुरुवात होऊ शकते. मुलांचे कलागुण उजळतील आणि वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल.

Image Source: ABP MAJHA

मीन रास (Pisces)

हा आठवडा लाभदायक असणार पण थोडासा कठीण ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीला अडचणी येतील. आरोग्याची काळजी घ्या आणि नियमित व्यायाम करा.

Image Source: ABP MAJHA

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: ABP MAJHA