आपल्यापैकी अनेकांच्या शरीराच्या विविध अवयवांवर अनेक तीळ असतात. अनेकदा आपण या तीळांकडे दुर्लक्ष करतो. सामुद्रिक शास्त्रानुसार, शरीराच्या काही भागांवर तीळ असणं म्हणजे सौभाग्याचं लक्षण मानलं जातं. ज्या लोकांच्या शरीरावर तीळ असतात. अशा लोकांच्या जन्मत:च पैसा, धन-संपत्ती मिळते अशी मान्यता आहे. उजव्या गालावर तीळ असणे हे भाग्यवान असल्याचे लक्षण आहे. असे लोक फार कमी मेहनत करुनही मोठं यश मिळवतात. ज्या लोकांच्या नाकावर तीळ असतो असे लोक फार भाग्यवान असतात असं म्हणतात. विशेषत ज्या लोकांच्या नाकाच्या टोकावर तीळ असतो, त्यांना जीवनात सर्व सुख-सुविधा मिळतात अशी मान्यता आहे.