शनीच्या वाईट प्रकोपाला सर्वच जण घाबरतात.



ज्योतिषशास्त्रात शनि हा क्रूर आणि कठोर ग्रह म्हणून ओळखला जातो, यामुळेच शनिला सर्वजण घाबरतात.



यातच तब्बल अडीच वर्षांनंतर शनि रास बदलणार आहे.



शनीच्या राशी परिवर्तनानंतर अनेक राशींना चांगले दिवस येतील, तर काही राशींना साडेसातीचा सामना करावा लागेल.



29 मार्च 2025 रोजी शनि मीन राशीत प्रवेश करेल, सध्या तो स्वत:च्या कुंभ राशीत आहे.



शनि कुंभ राशीत असेपर्यंतचा 78 दिवसांचा काळ काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे.



शनीचा कोणत्या राशींवर शुभ हस्त असणार? या लकी राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.



मेष रास (Aries) : पुढील 78 दिवस तुमच्यासाठी आनंदाचे असतील. या काळात तुमच्या संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे.



सिंह रास (Leo) : 29 मार्चपर्यंतचा काळ सिंह राशीच्या लोकांसाठी खास असेल. कामात तुमची प्रगती होऊ शकते, पगार वाढू शकतो.



तूळ रास (Libra) : पुढचा 72 दिवसांचा काळ तूळ राशीच्या लोकांसाठी खूप भाग्याचा ठरेल. तुम्ही वाहन, मालमत्ता किंवा इतर कोणतीही वस्तू खरेदी करण्याचा विचार करू शकता.