भारतात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

Published by: जयदीप मेढे
Image Source: google/mint

जन्माष्टमीच्या दिवशी उपवास ठेवून रात्री 12 वाजता बाळकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करतात यावेळी श्रीकृष्णाला वेगवेगळी फळं, दही-पोहे, सुंठ असे पदार्थ अर्पण करतात.

Image Source: google/pinterest

जन्माष्टमीचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी श्रीकृष्णाची मनापासून पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात.

Image Source: google

यंदा जन्माष्टमी 26 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. या दिवशी पुढील 7 वस्तू घरी आणल्यास तुम्हाला धनाची कमतरता भासणार नाही.

Image Source: pexels

शंख

हिंदू धर्मात शंख अत्यंत शुभ मानले जाते.मंदिरात शंख वाजवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी शंख घरी आणू शकता.

Image Source: google/sarvdharm

बासरी

भगवान श्रीकृष्णाला बासरी खूप प्रिय आहे. या दिवशी घरात बासरी आणल्याने घरात सुख-शांती येईल आणि तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील.

Image Source: google/freeup

मोर पंख

मोराचे पंख श्रीकृष्णाला फार आवडते. श्रीकृष्णाच्या डोक्यावर नेहमी मोरपंख पाहायला मिळतो मोर पंख घरात आणल्यास शांतता कायम राहते.

Image Source: pexels

गाय आणि वासरूचा फोटो

भगवान श्रीकृष्णाला गाईची सेवा करायला फार आवडायचे त्यामुळे या दिवशी तुम्ही गाय आणि वासरूचा फोटो देखील घरी आणू शकता.

Image Source: google

तुळशीचे रोप

तुळशीचे रोप हे देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. घरात तुळशीचे रोप लावल्याने घरात धनाची भरभराट होते.

Image Source: pixabay

बाळकृष्णाची मूर्ती

जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाची मूर्ती घरात आणून पूजा केली जाते. घरासाठी हे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे घरात प्रसन्नता निर्माण होते.

Image Source: google/Shutterstock

दही

दही श्रीकृष्णाला फार प्रिय आहे. जन्माष्टमीच्या दिवशी दह्याचा नैवेद्य श्रीकृष्णाला दाखवल्याने आर्थिक तंगीपासून बचाव होईल.

Image Source: google/Shutterstock