7 क्रमांकाचे लोक फार रहस्यमय, अंतर्मुख (introvert) आणि बुद्धिमान स्वभावाचे असतात. कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूळ संख्या 7 असते. ज्योतिषशास्त्रात 7 क्रमांकाचा संबंध गुरु ग्रहाशी थेट जोडला आहे. मूलांक 7 असणारे लोक शांत आणि अंतर्मुख स्वभावाचे असतात. या लोकांना त्यांचे आयुष्य खाजगी ठेवायला आवडतं. या मूलांकाचे लोक फार बुद्धिमान आणि जिज्ञासू स्वभावाचे असतात. या लोकांना अध्यात्मात विशेष रुची असते. 7 क्रमांकाचे लोक स्वातंत्र्य आणि स्वावलंबी असतात, कोणावरही अवलंबून राहणे त्यांना आवडत नाही. हे लोक आपल्या कुटुंबासाठी खूप भाग्यवान सिद्ध होतात. आपल्या मेहनतीच्या जोरावर हे लोक आपल्या कुटुंबाला वैभव मिळवून देतात.