गूळ आरोग्यासाठी फायदेशीर असला तरी तो तुमचं नशीब बदलण्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरतो.
गुळाच्या खड्याच्या या उपायानं तुमचं नशीब तुम्हाला साथ देईल आणि तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वादही मिळेल.
तुमच्या पुत्रिकेत सूर्याचा प्रभाव कमी झाला असेल, तर तुमच्या दिवसाची सुरुवात जररोज गुळाचा खडा खाऊन त्यावर थोडसं पाणी पिऊन करा.
त्यासोबतच रविवारपासून पुढचे 8 दिवस 800 ग्रॅम गहू आणि 800 ग्रॅम गूळ मंदिरात जाऊन देवाला अर्पण करा.
यासाठी एक छोटासा गुळाचा खडा घ्या, लाल कपड्यात एक नाण्यासोबत बांधा. त्यानंतर तुमच्या देवघरातील लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर ठेवून द्या.
दररोज याची विधीवत पूजा करा. पाचव्या दिवशी देवीची आराधना केल्यानंतर तो गुळाचा खडा घ्या आणि तुमच्या कपाटात किंवा तिजोरीत ठेवून द्या.
एका पिवळ्या कपड्यात 7 हळकुंड आणि छोटासा गुळाचा खडा घेऊन बांधा. त्यानंतर तुम्ही जिथे पैसे ठेवता, तिथे हे ठेवा.
21 दिवसांनी हे वाहत्या पाण्यात सोडून द्या. असं केल्यानं डोक्यावरचा कर्जाचा बोजा कमी होण्यास मदत होईल.
प्रत्येक गुरुवारी पिठामध्ये थोडासा गूळ, तूप आणि हळद एकत्र करुन गाईला खालया द्या. आठ गुरुवार असं केल्यानं लग्न जुळताना येणाऱ्या अडचणी दूर होतील.
एक चपाती किंवा भाकरी गायीसाठी बाजूला काढा. त्यासोबत गुळाचा खड्या खायला द्या. असं दररोज केल्यानं काही दिवसांतच तुमचा नोकरीचा शोध थांबेल.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)