अनेकांच्या पायात किंवा हातात काळा धागा बांधलेला आढळतो.



काही राशींच्या लोकांसाठी काळा धागा परिधान करणं फायद्याचं नाही. नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


मेष रास (Aries)

मेष राशीच्या लोकांनी विचारपूर्वक काळा धागा घालावा


तुमच्या राशीचा स्वामी मंगळ शनि ग्रहाशी शत्रुत्वाची भावना बाळगतो. त्यामुळे काळा धागा घातल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो.


कर्क रास (Cancer)

कर्क राशीच्या लोकांनीही हाताला किंवा पायात काळा धागा घालू नये


अधिपती ग्रह चंद्राची शनि आणि राहू यांच्याशी शत्रुत्वाची भावना आहे. त्यामुळे काळा धागा धारण केल्याने तुम्हाला नुकसान सहन करावं लागू शकतं.


सिंह रास (Leo)

काळा धागा घालणं सिंह राशीच्या लोकांसाठी हानिकारक ठरू शकतं


तुमच्या राशीचा स्वामी सूर्य आहे आणि त्याचं शनिदेवाशी वैर आहे. त्यामुळे काळा धागा घातल्याने आत्मविश्वास कमी होतो.


वृश्चिक रास (Scorpio)

काळा धागा घालणं तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतं.


तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आहे आणि त्याचं शनिदेवाशी वैर आहे. त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांनीही काळा धागा घालणं टाळावं.