श्रावणमासाला सुरुवात झाली आहे.त्यानुसार,वातावरणात एक प्रकारे प्रसन्नता दिसतेय. श्रावणाच्या पंचमी तिथीला नागपंचमीचा दिवस साजरा केला जातो. त्यानुसार येत्या 9 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात नागपंचमी साजरी केली जाणार आहे. नागपंचमीचा सण नागदेवाला समर्पित आहे. नागदेवतेची पूजा केल्याने सुख-समृद्धी प्राप्त होत अशी मान्यता आहे. असं म्हणतात की,या काळात उपासनेचे नियम न पाळल्याने साधक शुभ फळ मिळण्यापासून वंचित राहतो. नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून पूजा करावी. या दिवशी मंदिरात चांदीच्या नागाला दुधाने अभिषेक करावा. दूध अर्पण करण्यासाठी पितळेचे भांडे चांगले मानले जाते. पंचांगानुसार,श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी 9 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12:36 वाजता सुरू होईल.