आज आर्थिक स्थिती थोडी अडचणीचीच राहील. महिला परधर्जीनी ठरतील.
तुमच्या बेबंध उत्साहला तर्क संगतीची जोड दिली तर अशक्य वाटणारी गोष्ट करून दाखवाल.
परदेश प्रवासाचे बेत आखत असाल तर लवकर कागदपत्रांची पूर्तता करून घ्या.
शिक्षणासंबंधी सर्व क्षेत्रांमध्ये आघाडीवर राहाल.
उच्च शिक्षणाच्या संधी मिळतील. शेअर बाजारात गुंतवणूक करावीशी वाटेल.
ज्या क्षेत्रातील ज्ञान असेल तेथेच पैसा गुंतवायला हरकत नाही.
व्यवसायिक कामामध्ये दिरंगाई झाली तरी अंतिम यश तुमचेच आहे, त्यामुळे काळजी करू नये.
स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही या उक्तीप्रमाणे काम केलेत तर आर्थिक फायदे मिळू शकतील.
आजचा दिवस गडबडीचा जाईल. अतिशय व्यवस्थित आणि टापटीपीने राहाल.
आर्थिक टंचाईमधून बाहेर याल. लोकांची देणे देता आल्यामुळे हायसे वाटेल.
मानसिक अशांतता राहणार आहे. व्यवसायात अनेक गोष्टींमुळे बेचैनी वाढेल.
कष्टाच्या मानाने फळ कमी मिळाल्यामुळे चिडचिड होईल.
टीप: वरील उपाय केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.