आज आत्मविश्वास थोडा वाढवा. ओंकार साधना आणि प्राणायामचा आधार घेतला तर त्रास होणार नाही.
अति भावनेच्या आहारी जाऊन महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. एखादी कलाकृती करण्याची स्फूर्ती मिळेल.
घशाचे विकार आणि ॲनिमिक कंडिशन यासारख्या विकारांवर वेळीच औषधोपचार घेतले नाहीत तर अशक्तपणा जाणवेल.
कलेच्या क्षेत्रात वावरणाऱ्यांना मानसिक समाधान मिळेल. शिल्लक अडचणींनी निराश होण्याचे कारण नाही.
महिलांना काल्पनिक चिंता आणि दुःख सतावेल. डोंगराएवढी चूक करून स्वतःच निस्तराल.
नोकरी व्यवसायात नवीन योजनांचे स्वतः नेतृत्व कराल आणि खूप काम कराल.
आज स्वतःबरोबर दुसऱ्यांनाही आत्मविश्वास द्याल. जशी परिस्थिती समोर येईल त्याप्रमाणे कामाची पद्धत.
घरातील मोठ्या माणसांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल, कोणतेही दुखणे अंगावर काढून चालणार नाही.
घरामध्ये लहरीपणा जास्त वाढेल. रोजच्या जीवन पद्धतीत काही सुधारणा कराल.
शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळाल्यामुळे मनःशांती मिळेल.
महिलांचा तापटपणा वाढेल परंतु राग आला तरी लवकर शांत व्हाल.
सतत कष्ट करणाऱ्याला काळ नेहमीच भरपूर देऊन जातो याचा प्रत्यय आज येईल.
टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.