घरामध्ये तुमच्या मनासारखे लोक वागत नाहीत ही तक्रार राहिली तरी काही गोष्टींकडे कानाडोळा करावाच लागेल.
व्यवसायात खूप दिवसांपासून अडलेली कामे मार्गी लागतील महिला घरगुती समारंभात राहतील.
नोकरीमध्ये एखाद्या कामातील कौशल्यामुळे वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.
खेळत्या भांडवलात वाढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील कारण त्यावरच तुमच्या पुढच्या योजना अवलंबून असतील.
आज विचारांमध्ये गोंधळ दिसेल. तरुणांना प्रेमात पडावे असे वाटेल.
कोणतेही काम करण्याचे धाडस गोळा करावं लागेल. थोडी मानसिक अस्थिरता जाणवेल.
अति संवेदनशील स्वभावाचा तोटा सहन करावा लागेल. सहलीला जाण्याचे बेत ठरतील.
कुठेही गेला तरी डोकं शांत ठेवावं लागेल नाहीतर शारीरिक आणि मानसिक प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे.
कामामध्ये दक्षता घेणे आवश्यक आहे. तुमच्या बोलण्याची छाप इतरांवर पडेल.
तुमच्या उत्कृष्ट कामामुळे इतरांच्या मनाची पकड फार चांगल्या रीतीने घ्याल.
वास्तव गोष्टी किंवा विचारांकडे तुमचे लक्ष लवकर आकर्षित होईल.
आज विश्रांती चैन करण्याचा मूड राहील. महिला जवळच्या व्यक्तींसाठी फारच उदार बनतील.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.