आज तुमची हुशारी विधायक सर्जनशील कामाकडे लावायला हवी.
दुसऱ्यावर टीका केल्यास तुम्हाला मनस्ताप होईल.
हट्टीपणा आणि अहंकार या दोन गोष्टी प्रगतीला मारक ठरतील.
घरातील मोठ्यांचे विचार न पटल्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे.
महिलांना वैवाहिक जीवनात समजूतीचं धोरण स्वीकारावं लागेल.
आज आत्ता काय करायचं आहे याचा विचार करा, फार पुढचा विचार करू नका.
आवश्यक ती कामं संपवायच्या मागे लागाल. महिला दुसऱ्यांना सहकार्य करतील.
वडिलोपार्जित इस्टेट संबंधीची कागदपत्रं जमवण्यासाठी वेळ काढायला हवा.
जवळच्या प्रवासाचे योग येतील. व्यवसायामध्ये महत्त्वाच्या लोकांच्या मनाविरुद्ध वागाल.
कामाऐवजी संघर्षाचे प्रसंग जास्त येतील. सारासार विचार करून निर्णय घ्या.
जसे बोलाल तसे वागण्याचा प्रयत्न केला तर परिस्थिती आटोक्यात येईल.
तुमच्या प्रभावी बोलण्यामुळे जवळपासचे लोक फिदा होतील.
टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.