मेष रास (Aries)

तुम्ही तुमच्या तब्येतीबद्दल अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे, अन्यथा एक छोटीशी चूक देखील तुम्हाला महागात पडू शकते.

वृषभ रास (Taurus)

तुम्ही रात्री उशिरा जेऊ नये, अन्यथा तुमचं पोट खराब होऊ शकतं आणि तुमचा त्रास आणखी वाढू शकतो.

मिथुन रास (Gemini)

आज पचायला हलकं अन्न खा, नाहीतर तुमचं पोट खराब होऊ शकतं, त्यामुळे सहज पचणारं अन्न खावं.

कर्क रास (Cancer)

आज तुम्हाला शारीरिक समस्यांमुळे त्रास होऊ शकतो. तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका.

सिंह रास (Leo)

तुमच्यावर कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल तर आरोग्याची काळजी घ्या, जास्त वजन उचलू नका.

कन्या रास (Virgo)

तुमचं आरोग्य चांगलं असेल पण आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करू नका. वेळोवेळी आरोग्य तपासणी करा.

तूळ रास (Libra)

सर्दी, खोकला, ताप असे जे काही आजार तुमच्या आरोग्याला त्रास देत होते, उद्या तुम्हाला आराम मिळू शकतो.

वृश्चिक रास (Scorpio)

महिलांनी खासकरून त्यांच्या केसांची उद्यापासून काळजी घ्यावी.

धनु रास (Sagittarius)

आज तुम्हाला डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. यासाठी ऑफिसमध्ये थोडा वेळ विश्रांती घ्या.

मकर रास (Capricorn)

जे अस्थमाचे रूग्ण आहेत त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्या. बदलत्या वातावरणाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

कुंभ (Aquarius)

जर तुम्हाला कोणत्या गोळ्या सुरु असतील तर त्यात खंड पडू देऊ नका. यामुळे तुम्हाला जास्त अस्वस्थ वाटू शकतं.

मीन (Pisces)

आज तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, तुम्हाला काही गंभीर आजारांमुळे खूप त्रास सहन करावा लागू शकतो