अज्ञानी माणसाशी कधीही वाद घालू नये, तो बैलासारखा असतो, ज्ञानाने नाही तर आकाराने मोठा दिसतो.
लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे. पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे.
भूतकाळातील वाईट काळाची आठवण ठेवू नये,भविष्याची स्वप्नं पाहू नयेत, फक्त वर्तमानावर लक्ष केंद्रित करावं.
संशयी स्वभाव अत्यंत घातक असतो. हा स्वभाव दोन चांगले मित्र, प्रेमी आणि कोणत्याही चांगल्या नात्याला नष्ट करतो.
कोणाचाही द्वेष आणि मत्सर बाळगून जीवनात आनंद मिळत नाही, मत्सर माणसाची मनःशांती नष्ट करतो.
तुम्ही तीच गोष्ट गमावता ज्या गोष्टीला तुम्ही अधिक बिलगता, अथवा चिकटून राहता.
जशी मेणबत्ती अग्नीशिवाय जळू शकत नाही, त्याचप्रमाणे मनुष्यही आध्यात्मिक जीवनाशिवाय जगू शकत नाही.
कोणाचाही सूड उगवू नका. आपल्या कर्माला त्याचे काम करू द्या. कारण कोणतीही वाईट गोष्ट जास्त काळ टिकत नाही.
प्रत्येक नवी सकाळ ही पुनर्जन्म असते. त्यामुळे काल काय झालं हे विसरून नवी सुरूवात करा.आजचा दिवस अधिक सुंदर बनवा.
कोणतीही अडचण असेल तर ती सोडवा अथवा सोडून द्या. त्या अडचणीसह राहू नका, त्याचा अधिक त्रास होईल.