सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या 'चोर' गणपतीची पहाटे प्रतिष्ठापना झालीय.
चोर पावलांनी येणारा गणपती म्हणून हा सांगलीच्या गणपती पंचायतन संस्थानचे हे गणपती प्रसिद्ध आहेत.
भाद्रपद शुद्ध प्रतिपदेनिमित्त प्रतिष्ठापना होणाऱ्या या चोर गणपतीला १५० वर्षांची परंपरा आहे.
पंचायतन संस्थानच्या गणेशाची प्रतिपदेला म्हणजे चतुर्थीच्या चार दिवस आधी प्रतिष्ठापना होते.
चोर गणपती केव्हा आला अन् गेला याचा गणपती भक्त, भाविकांना थांगपत्ता लागत नसल्याने या विघ्नहर्त्याला चोर गणपती' म्हणण्याची प्रथा रूढ झाल्याची आख्यायिका आहे.
गणेशचतुर्थीच्या आधी या चोर गणपतीची प्रतिष्ठापना होते.
साडेतीन फुटांच्या दोन मूर्तींची प्रतिष्ठापना होते.
दोनशे वर्षांपूर्वी कागदाच्या लगद्यापासून पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यात आली होती.
तेव्हापासून दरवर्षी त्याच दोन मूर्तीची स्थापना केली जाते.
उत्सवानंतर मूर्ती सुरक्षितस्थळी ठेवण्यात येतात.