चाणक्य म्हणतात, श्वान फार संवेदनशील असतात. ते आपल्या मालकांच्या भावनांना लवकर समजून घेतात. हा स्वभाव मनुष्याने देखील आत्मसात करणं गरजेचं आहे. श्वान आपल्या मालकाप्रती फार प्रामाणिक असतो. चाणक्य म्हणतात, मनुष्याने सुद्धा ही सवय जोपासली पाहिजे. चाणक्यांच्या मते, श्वान हे प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीत आनंदी आणि खुश असतात. आपल्या मालकावर आलेलं संकट पाहून तो समोर येणाऱ्या कोणत्याही पाहुण्याशी लढतात. आचार्य चाणक्या यांच्या मते श्वान हा फार सतर्कतेने झोपतो. माणसाने देखील अशीच सतर्कता दाखवावी. श्वानाचा स्वभाव हा फार संयमी असतो. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)