उच्चपदस्थ लोकांशी संबंध येऊन त्यांच्यामुळे आर्थिक प्रश्न सुटून जातील. धंद्यामध्ये पार्टनरशिप जमवून घ्यावे लागेल.
कमी वेळामध्ये जास्त काम करण्याच्या प्रयत्नात हास्यास्पद चुका कराल.
कामाचे गती चांगली राहील. त्याला भाग्याची साथ ही मिळेल तरीसुद्धा प्रयत्नांचे महत्त्व अजिबात कमी होऊ देऊ नका.
महिला किरकोळ गोष्टीतही मानापमान ठेवतील. दैव देतं आणि कर्म नेते अशी काहीशी तुमची अवस्था आज होणार आहे.
आज थोडी निराशा पदरात पडली तरी घाबरून जायचे कारण नाही. कुटुंबा बाबत जरा जास्त भावनिक बनाल.
अतिभावना प्रधानता काही वेळेस घातक ठरू शकते हे लक्षात ठेवा. त्यामुळे अपेक्षाभंगाचे दुःख पदरात पडेल.
नोकरी धंद्यामध्ये कामाच्या बाबतीत अव्यवहारी निर्णय घेतले जातील. महत्त्वाच्या कागदपत्रांवर न बघता सह्या करू नका.
आपले सामर्थ्य ओळखून कामाचा आवाका वाढवा कारण बहुतेक वेळा कष्ट न करण्याकडेच प्रवृत्ती राहील.
पैसा मिळवण्यासाठी कष्टा व्यतिरिक्त इतर कोणत्याही मार्गाचा अवलंब केल्यास महागात पडेल.
विद्यार्थी अभ्यासाच्या बाबतीत वेगळ्या पद्धतीचा अवलंब करतील त्यांच्या वागण्यामध्ये थोडा विक्षिप्तपणा जाणवेल.
आपल्या कृतीमुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. इतरांची बोलणी ऐकून घ्यावी लागतील.
तुमची काम करण्याची अपेक्षा वेगळी असेल परंतु मनाप्रमाणे काम न झाल्यामुळे वरिष्ठांची बोलणी ऐकून घ्यावी लागतील.