प्रेम जीवन सुधारण्यासाठी देखील चाणक्य नीतिमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
चाणक्य म्हणतात की, जी व्यक्ती आपल्या जीवनसाथीशी किंवा प्रेम करणाऱ्या व्यक्तीशी पूर्णपणे प्रामाणिक राहते.
ती आदर्श जोडीदार असते. म्हणजेच अशी व्यक्ती परस्त्री किंवा परपुरुषाकडे पाहतही नाही, त्यांचे नाते कधीच तुटत नाही.
विश्वास हा प्रेमाचा पाया आहे. जर, नात्यात विश्वास नसेल, तर ते नाते जास्त काळ टिकू शकत नाही.
जे आपल्या जोडीदाराला स्वतःच्या मनाप्रमाणे जगण्याचे स्वातंत्र्य देतात, त्यांचे नाते नेहमीच यशस्वी होते.
चाणक्य नीतिनुसार, जो व्यक्ती आपल्या प्रेयसी किंवा पत्नीकडे आदराने पाहतो, त्यांचा सन्मान करतो, त्यांचे नाते कधीही तुटत नाही.
जी व्यक्ती प्रेमात धन, संपत्ती, पदाचा अभिमान कधीच दाखवत नाही, त्यांचे नाते दीर्घकाळ टिकते.
असे मानले जाते की, प्रत्येक स्त्रीला तिच्या पतीमध्ये तिच्या वडिलांची प्रतिमा दिसते.
जर तुम्ही देखील तिच्याशी तसेच वागलात, तर ती कायम तुम्हाला साथ देईल यात काहीच शंका नाही.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)