मार्गशीर्ष अमावस्या 30 नोव्हेंबर 2024 रोजी आहे. या दिवशी स्नान आणि दान करण्याचं विशेष महत्त्व आहे.
अमावस्येला भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांची पूजा केली जाते.
या वेळी मार्गशीर्ष अमावस्या शनिवारी येत असल्याने तिला शनी अमावस्या असंही म्हटलं जाईल.
मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी चुकूनही कोणत्या चुका करू नयेत, ते जाणून घ्या.
या अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांच्यासोबत शनिदेवाचीही पूजा करावी.
अमावस्येच्या दिवशी चुकूनही तुळशीची पाने तोडू नयेत.
अमावस्येच्या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये. या दिवशी सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा, आंघोळ करा आणि पूजा करा.
अमावस्येच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याची चूक करु नका, यामुळे जीवनात नकारात्मकता वाढते.
अमावस्येच्या दिवशी इतर कोणासाठीही अपशब्द वापरू नका.
टीप : आम्ही वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.