मेष रास (Aries)

आज कामाच्या ठिकाणी इतरांच्या बोलण्याने प्रभावित होऊ नका. प्रत्येक गोष्टीवर तुमचं मत मांडा.

वृषभ रास (Taurus)

प्रियकराच्या नात्याबद्दल तुम्ही आज जास्त विचार कराल. मनात अनेक विचार येतील पण वेळीच त्यांना थांबवा.

मिथुन रास (Gemini)

कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कामाने इतरांना प्रभावित करू शकता. स्वतःवर विश्वास ठेवा.

कर्क रास (Cancer)

आज कामाच्या ठिकाणी कोणतीच जोखीम घेऊ नका. यामुळे तुमचे आर्थिक, सामाजिक नुकसान होऊ शकते.

सिंह रास (Leo)

तुमचा व्यवसाय चांगला चालेल. कामाच्या संदर्भात तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो.

कन्या रास (Virgo)

तुम्हाला ज्या काही गोष्टींचा त्रास होतोय. त्याबद्दल तुम्ही कुटुंबियांशी चर्चा करा. यामुळे अनेक प्रश्न सुटतील.

तूळ रास (Libra)

आज तुम्ही तुमच्या कामावर मनमानी कारभार करू नका, तुमचा बॉस तुमच्यावर रागावू शकतो.

वृश्चिक रास (Scorpio)

आज कोणतंही काम चुकू देऊ नका, तरच तुमचे अधिकारी तुमच्यावर खूश राहतील.

धनु रास (Sagittarius)

तुम्ही तुमच्या लहान भाऊ आणि बहिणींशी नीट वागलं पाहिजे, त्यांच्या सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा.

मकर रास (Capricorn)

जास्त खर्च करू नका,आठवड्याच्या सुरुवातीला जास्त खर्चामुळे त्रास होईल. तुमची तब्येत या काळात बिघडू शकते.

कुंभ (Aquarius)

प्रेम प्रकरणात यश मिळेल आणि विवाहितांना त्यांच्या मुलांकडून प्रेम मिळेल.

मीन (Pisces)

आजचा दिवस चांगला आहे.तुमच्यामधीस काही खास गोष्टी तुमच्या बॉसला प्रभावित करतील.