'68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' सोहळ्यात अभिनेत्री आशा पारेख यांना 'दादासाहेब फाळके पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले आहे.



राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे



आशा पारेख या 60-70 चं दशक गाजवलेल्या अभिनेत्री आहेत



त्यांना 1992 साली मानाच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.



आशा पारेख म्हणाल्या,राष्ट्रपतींच्या हस्ते मला दादासाहेब फाळके पुरस्कार' वयाच्या 88 वर्षी मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे.



माझ्या सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल मला हा पुरस्कार दिल्याबद्दल आभार.



नवोदित कलाकारांना चांगलं काम करण्याचा, शिस्तीत राहण्याचा आणि कितीही गगनभरारी घेतली तरी



जमिनीवर राहण्याचा मी सल्ला देत आहे. तसेच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सर्व विजेत्यांचं अभिनंदन.



'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' हा भारतातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कार आहे. 1954 साली या पुरस्कार सोहळ्याची सुरुवात करण्यात आली आहे.



तर 'दादासाहेब फाळके पुरस्कार' हा भारतीय सिनेक्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो.



भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. यंदा आशा पारेख यांना या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.



त्यांनी 'जब प्यार किसी से होता है' (1961), 'फिर वही दिल लाया हूं' (1963), 'तिसरी मंजिल' (1966), 'बहारों के सपने' (1967),



'प्यार का मौसम' (1969), 'कटी पतंग' (1970) आणि 'कारवं' (1971), 'मंजिल मंजिल' (1984) अशा अनेक गाजलेल्या सिनेमांत त्यांनी काम केलं आहे.



आशा पारेख सध्या अभिनयक्षेत्रापासून दूर आहेत.



अभिनेत्री असण्यासोबत त्या उत्तम नृत्यांगनादेखील आहेत.