अयोध्येतील राम मंदिराचे दि.22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. (छायाचित्र सौजन्य : अरुण योगीराज)



कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या रामललाच्या मूर्तीचा अयोध्येत उभारलेल्या भव्य राम मंदिरात अभिषेक करण्यात आला. (छायाचित्र सौजन्य : अरुण योगीराज)



कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी कृष्णशिला येथे ही मूर्ती तयार केली आहे. (छायाचित्र सौजन्य : अरुण योगीराज)



शिल्पकार अरुण योगीराज हे कर्नाटकातील म्हैसूर शहरातील रहिवासी आहेत. (छायाचित्र सौजन्य : अरुण योगीराज)



अरुण योगीराज यांना शिल्पकलेचा वारसा त्यांच्या कुटुंबातूनच मिळाला आहे. (छायाचित्र सौजन्य : अरुण योगीराज)



देशातील विविध राज्यांमध्ये अरुण यांनी घडवलेल्या कोरीव आणि रेखीव मूर्तींना मोठी मागणी आहे. (छायाचित्र सौजन्य : अरुण योगीराज)



खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुण यांच्या कौशल्याचं कौतुक केलं आहे. (छायाचित्र सौजन्य : अरुण योगीराज)



आता अयोध्येतील भव्य राम मंदिरात विराजमान झालेल्या प्रभू श्रीरामाची मूर्ती घडवण्याचं भाग्यही लाभलं. (छायाचित्र सौजन्य : अरुण योगीराज)



अरुण योगीराज यांनी 2008 मध्ये म्हैसूर विद्यापीठातून एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं. (छायाचित्र सौजन्य : अरुण योगीराज)



प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी सुभाषचंद्र बोस यांचा 30 फूट उंचीचा पुतळा घडवला होता. (छायाचित्र सौजन्य : अरुण योगीराज)