खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार सध्या 'राम सेतु' या सिनेमामुळे चर्चेत आहे. 'राम सेतु' हा सिनेमा आधी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असे म्हटले जात होते. पण आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार नसून सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 'राम सेतु'च्या निर्मात्यांनी नुकतीच यासंदर्भात माहिती दिली आहे. राम सेतू व्यतिरिक्त अक्षय कुमारचे अनेक सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'रक्षाबंधन', 'मिशन सिंड्रेला' हे अक्षयचे आगामी सिनेमे लवकरच प्रदर्शित होणार आहेत. कोरोनामुळे या सिनेमांना काहीसा ब्रेक लागला होता. मात्र, आता पुन्हा एकदा ते बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला सज्ज झाले आहेत. अक्षय कुमारच्या चाहत्यांना त्याच्या सिनेमाची उत्सुकता आहे. सोशल मीडियावर अक्षयचा मोठा चाहतावर्ग आहे.