स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. या दोघांचा साखरपुडा आता पार पडणार आहे. नुकतचं स्वानंदीने तिच्या साखरपुड्याच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. स्वानंदी आणि आशिषच्या मित्र परिवाराने देखील त्यांनी त्यांच्या नव्या सुरुवातीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. रोमॅंटिक फोटो शेअर करत स्वानंदीने या फोटोंना हटके कॅप्शन लिहिलं आहे स्वानंदीने 20 जुलैला सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत नात्याची जाहीर कबुली दिली होती. आता स्वानंदीचा साखरपुडा होत असल्याने चाहतेही तिच्या आनंदात सहभागी झाले आहेत.